राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )किनवट-माहूर विधानसभा मतदार संघात खडतर मार्गातून मार्गक्रमण करून मागील ३० वर्षा पासुन शाखा प्रमुख, तालुका प्रमुख व जिल्हा उप प्रमुख या पदावर निष्ठेने काम करून शिवसेनेचे रुपांतर वट वृक्षात करणाऱ्या ज्योतिबा खराटे यांची जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करा अशी विनंती न.पं.चे माजी गटनेते बालाजी वाघमारे यांनी 10 जुलै रोजी पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवीलेल्या निवेदनातून केली आहे.
शेतकरी व समाजातील शेवटच्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळोवेळी केलेल्या आंदोलनासह 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या शिवसेनेच्या ब्रिदाचा योग्य तो सन्मान राखल्याचा मोठा लाभ लोकसभा,विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेसह मित्र पक्षाला झाल्याचे वास्तव लक्षात घेवून ज्योतीबा खराटे यांची जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करावी अशी मागणी बालाजी वाघमारे यांनी पाठवीलेल्या निवेदनातून केली आहे.

COMMENTS