सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत व डोसोउत्पत्ती स्थाना मध्ये वाढ झाली आहे. तसेच वातावरणातील बदलामुळे डेंग्यू रुग्ण व ताप रुग्ण संख्येत वाढ होत आहे. मौजे बटाळा ता.भोकर जि.नांदेड येथे मागील एक आठवडायापासून डेंग्यू रुग्ण व ताप रुग्ण वाढल्याची माहिती श्री गणेश कापसे सरपंच बटाळा यांनी डॉ राहूल वाघमारे तालुका आरोग्य अधिकारी भोकर यांना दिली त्यानुसार आज दि.६ ऑगस्ट रोजी बटाळा येथे तालुका स्तरीय पथकाने भेट देऊन गावामध्ये घरोघरी भेट देऊन ताप रुग्ण सर्वेक्षण, कंटेनर तपासणी केली दुषीत ठिकाणी अबेटिंग करण्यात आली. किटकजन्य आजार डेंग्यू,हिवताप,हत्तीरोग व चिकुन गुनिया या आजारा विषय सविस्तर माहिती व आरोग्य शिक्षण ग्रामस्थ यांना सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य पर्यवेक्षक (हिवताप) भोकर यांनी दिली. आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळयाचे महत्त्व सांगितले. सर्वांनी आपल्या घरातील सांडपाणी ठिकाणे दर शनिवारी रिकामे करून घासूनपुसून स्वच्छ करण्यात यावी, आपला परिसर स्वच्छ ठेवावा, नाली, मोरी वाहत्या करावीत अशी माहिती दिली.
श्री गणेश कापसे सरपंच यांनी गावामध्ये फिरून ताप रुग्ण असलेल्या घरी पथका सोबत भेट देऊन पाहणी केली.
श्रीमती अर्चना जटलावार आरोग्य सेविका यांनी गावामध्ये फिरून घरोघरी भेटून ताप रुग्ण सर्वेक्षण केले.
श्री गणेश गोदाम, रामराम जाधव, इंदल चव्हाण,मारोती गेंदेवाड हत्तीरोग क्षेत्र कर्मचारी अंकुश राठोड यांनी कंटेनर सर्वेक्षण व अबेटिंग केली.

COMMENTS