महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा मुखेड जि. नांदेड ची तालूका पातळीवरील बैठक 5 ऑगस्ट 2021 रोजी पार पडली. या बैठकीत मुखेड शाखेची कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता तुमवाड तर कार्याध्यक्षपदी विजय लोहबंदे यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष अॅड. संजय भारदे, प्रधान सचिव आनंद गायकवाड, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह - माजिद शेख, मारोती मायीलवाड, वार्तापत्र व प्रकाशन विभाग कार्यवाह - मेहताब शेख, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प विभाग कार्यवाह - अशोक पंपटवार, श्यामसुंदर दारुक, महिला विभाग कार्यवाह - अनिता राजूरकर, पंचफुला बिराजदार, विविध उपक्रम विभाग कार्यवाह - शिवाजी गेडेवाड, जात निर्मूलन व विवेकी जोडीदाराची निवड कार्यवाह - नामदेव बोमनवाड, मानसिक आरोग्य विभाग कार्यवाह - डॉ. राम श्रीरामे, युवा व विवेक वाहिनी विभाग कार्यवाह - सुखानंद गायकवाड, बालाजी लंगेवाड, सोशल मिडिया विभाग कार्यवाह - विजय संगमवार, प्रशिक्षण विभाग कार्यवाह - व्यंकट हंगरगे, कायदा विभाग कार्यवाह - अॅड. लक्ष्मण सोमवारे, शारदा जाधव, सांस्कृतिक विभाग कार्यवाह - अॅड. मिलिंद कांबळे अशी विभागनिहाय निवड सर्वानुमते करण्यात आली.
बैठकीच्या सुरुवातीला अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी पिटलेवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात अनिसचे ध्येयधोरण, रचना आणि पुढील भूमिका याची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर खेळीमेळीच्या वातावरणात कार्यकारिणी तयार करण्यात आली.
बैठकीमध्ये निवड झालेल्या अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

COMMENTS