सोनपेठ/प्रतिनिधी
पाथरी तालुक्यातील मुदगल येथील गोदावरीवर असणाऱ्या मोठ्या क्षमतेच्या बंधाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार रोजी सोनपेठ तालुका प्रशासनाने पाहिला.याबाबत अधिक माहिती अशी की,मुदगल येथील बंधाऱ्यावर सुरक्षा नसल्याने तेथून कोणाच्याही जीविताच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याचे दिसून येत आहे.मुदगल बंधाऱ्यावरील पाण्यामुळे सोनपेठ वासीय सुखावले असले तरी या बंधाऱ्याचा धोकाही तेवढाच असल्याचे दिसून येत आहे.हा धोका केवळ बंधारा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे असल्याचे स्पष्ट होत आहे.यात बंधाऱ्याच्या खालील बाजूस सोनपेठ तालुक्यासह मानवत तालुक्यातील बहुतांश गावाचा संपर्क येत असल्याने पाणी सोडताना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना दिल्या जात नाही.यामुळे शुक्रवार रोजी सोनपेठ तालुक्यातील लासिना येथील ४० वर्षीय राजेभाऊ विठ्ठल परांडे यांच्या जीवितास अचानक आलेल्या पाण्यामुळे धोका निर्माण झाला होता शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या परांडे यांची दोन शेळ्या व दोन पिल्ले या पाण्याने वाहून गेल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे.मुदगल बंधाऱ्यातून पाणी सोडताना मोठ्या आवाजामध्ये सायरन वाजवणे सूचनारुपी संदेश देणे.हे गरजेचे असताना याची गरज बंधारा प्रशासनातील कामचुकार अभियंता धनंजय सुरेश यस्के यांना वाटत नसल्याचे दिसून येत आहे.यावेळी पाण्यात अडकलेल्या विठ्ठल परांडे यांना तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तहसीलदार एश्वर्या गिरी,सोनपेठ पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने,गटविकास अधिकारी सचिन खुडे,तलाठी सागर मस्के, नगरपालिकेच्या अग्निशमन दलासह आपत्ती निवारण पथक दाखल झाले होते.यावेळी गावातील सरपंच शाम परांडे,पोलीस पाटील नंदकुमार परांडे,पत्रकार सुग्रीव दाढेल,ग्रा.प.सदस्य उमेश कदम,कालिदास परांडे,प्रकाश परांडे यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती.
*आठवर्षीय बालक थोडक्यात बचावला*
बंधाऱ्यातुन सोडण्यात येणारे पाणी कोणतीही पूर्वकल्पना देण्यात येत नसल्याने सोडण्यात येत असल्याची ओरड ग्रामस्थांनी केली आजच्या पाणी सोडण्याअगोदर काही मिनिटाच्या फरकाने दहावर्षीय बालक आर्यन किशन परांडे हा गोदावरीच्या पाण्यात पोहून आला होता.काही मिनिटाच्या फरकाने तो बचावल्याने घाबरलेल्या आर्यनला तहसीलदार एश्वर्या गिरी,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने यांनी धीर देऊन यापुढे गोदावरी नदीच्या पाण्यात कोणत्याही लहान बालकाला जाऊ देऊ नये अशा सूचना ग्रामस्थांना दिल्या.

COMMENTS