नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सुजलेगाव येथे ध्वजारोहण व वृक्षारोपन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला या सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून ए.पी.आय दिगंबर कांबळे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले एपीआय दिगंबर कांबळे यांनी शिव, शाहू, फुले,आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या जीवनावर विचार प्रकट केले. ते म्हणाले अण्णाभाऊ साठे हे एक विज्ञानवादी लेखक होते. म्हणून अण्णाभाऊ म्हणतात पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती कष्टकरी, मेहनत करणाऱ्या वर्गावर आधारित आहे आणि इथला निर्माता तू आहेस असे सांगितले त्याच बरोबर तरुणांनी दैववादी किंवा कर्मकांडात न अडकता महामानवांचा विचार आत्मसात करून एक नवे राष्ट्र निर्माण करावा तसेच त्यांच्या विचाराची मशाल पेटवावी,त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करावा. अण्णाभाऊ त्यांच्या कथा-कादंबरी मध्ये एक नायक घडविला आहे, अण्णाभाऊ जे जगले ,पाहिले तेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून वास्तवात आणले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. आकाश आईलवार यांनी केले.तर या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते . देवाले आकाश, राजीव वाघमारे, गणेश सूर्यवंशी, भीमराव सुर्यकार, नितीन कांबळे,संजय सुर्यकार, देवराव आईलवार, मधुकर आईलवार,आदिनाथ वाघमारे,विजय आईलवार, लक्ष्मण पाटील (उपसरपंच) साहेबराव सूर्यकार, रामदास सुर्यकार, आनंद शेळके.ईत्यादी उपस्थित होते.

COMMENTS