नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
नांदेड जिल्ह्यातील एस.व्ही.शिंदे शाखा अभियंता मुळ कार्यालय जि.प.बांधकाम उपविभाग देगलुर यांची बदली दि.13 जुन 2014 रोजी केवळ तीन महिन्यासाठी जि.प.बांधकाम उपविभाग मुखेड येथे सेवावर्ग करण्यात आलेले होते,पंरतु त्यांनी तब्बल दोन वर्ष म्हणजेच दि. 16 जुन 2016 पर्यत मुखेड येथेच कार्यरत होते.
शासन नियमाप्रमाणे एखादी अधिकारी/ कर्मचारी यांच्या मुळ पदस्थापनेच्या ठिकाणाहुन ईतरञ ठिकाणी प्रतिनियुक्ती झालेली असेल तर त्या संबधीत कार्यालयाने व कार्यालय प्रमुखाने प्रतिनियूक्तीवर असलेल्या कर्मचार्याची दि.1 ते 30 तारखेच्या दरम्यान उपस्थिती प्रमाणपञ देणे बंधनकारक आहे .याउपरही मुळ पदस्थापनेच्या ठिकाणी जोपर्यत उपस्थिती प्रमाणपञ देत नाही तोपर्यत त्या कर्मचार्याचे वेतन अदा केल्या जात नाही असे असतानाही श्री.एस,व्ही,शिंदे शाखा अभियंता यांचे नियमीत वेतन अदा करण्यात आलेले आहे.
उपअभियंता मुखेड यांनी एकाच प्रमाणपञावर 11 महिन्याचे उपस्थिती प्रमाणपञ देण्यात आलेले आहे.एस.व्ही.शिंदे शाखा अभियंता यांचे आदेश दि.18/07/2016 पासुन असताना जि.प.बाधंकाम उपविभाग मुखेडचे उपअभियंता यांनी दि.01/07/2016 ते 18/07/2016 पर्यत एकुण 18 दिवस जि.प.बाधंकाम उपविभाग मुखेड येथे उपस्थित नसताना सुध्दा प्रमाणपञ कोणत्या आधारे देण्यात आलेले आहे त्यांच्यावर ही तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
शाखा अभियंता एस.व्ही.शिदे यांना पाठीशी घालण्यात येत तत्कालीन जि.प.बाधंकाम दक्षिण विभाग नांदेड, या कार्यालयातील मा.कार्यकारी अभियंता,कार्यालयीन अधिक्षक,आस्थापना प्रमुख, तसेच जि.प.बाधंकाम उपविभाग मुखेड,व देगलुर येथील तत्कालीन उपविभागीय अभियंता,संबधीत आस्थापना विभागीतल कर्मचारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
अशा मागणीचे निवेदनच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड,जिल्हा पोलीस अधिक्षक नांदेड, मुख्यकार्यकारी अधिकारी नांदेड यांच्या कडे यांच्याकडे अविनाश घाटे जाहुरकर यांनी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे ..

COMMENTS