*ग्रामपंचायतच्या वतीने फिल्टरयुक्त पाणी सेंटरच्या लोकार्पणासह विविध विकासकामांचे उद्घाटन संपन्न*
सोनपेठ/प्रतिनिधी
नुकतेच पाथरी तालुक्यातील विटा(बु.)ग्रामपंचायतच्या वतीने गावातील नागरिकांना फिल्टरयुक्त पाणी असणाऱ्या मातोश्री ऍक्वा प्लांटच्या लोकार्पणासह विविध विकासकामाचे उद्घाटन संपन्न झाले.यावेळी गटविकास अधिकारी सुहास कोरेगावे हे या कार्यक्रमाचे उद्घाघाटक म्हणून होते.ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना शुद्ध पाणी देणे हे गरजेचे असून विटा(बु.)ग्रामपंचायतच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या फिल्टरयुक्त पाण्याचा प्लाँट विटावासीयांसाठी दिशा देणारा असल्याचे मत गटविकास अधिकारी सुहास कोरेगावे यांनी व्यक्त केले.यावेळी त्यांनी पुढे बोलतांना ग्रामस्थांनी स्वच्छता ठेवून ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन केले.तसेच मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी(बु.) ग्रामपंचायत सक्षम असल्याचे दिसून येत असल्याचे स्पष्ट करत आपण प्रत्येक गावांमध्ये जात असताना वेगळा अनुभव घेत असल्याचे सांगितले या गावात आल्यानंतर चांगला अनुभव पाहावयास मिळाला असल्याने ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी विस्तार अधिकारी पोतदार,लेंडाळे,ग्रामविकास अधिकारी संदीपान घुंबरे, ग्रामसेवक संदीप भोसले,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे,जिल्हा परिषद सदस्य माणिक घुंबरे,तालुकाप्रमुख मुंजा कोल्हे,उद्योजक संजय काबरा,सरपंच लताबाई
आरबाड,उपसरपंच महादेव हारकाळ,ग्रा.प.सदस्या किस्किंदा आरबाड,अनिता मालसमिदंर,गौळणबाई तुपसमिंदर,भास्कर आरबाड, उत्तम हारकाळ,प्रकाश हारकाळ, संजय वाघमारे,दत्ता देंडगे,आदींची उपस्थिती होती.तर या कार्यक्रमात सेवानिवृत्त सेवक भगवान जाधव यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन तूपसमिदंर,माणिक बदाले,अवधूत गिरी,कनैय्या आरबाड,प्रा.कैलास आरबाड,निवास हारकाळ,नारायण हारकाळ,माऊली राजे आरबाड,विजय आरबाड,अक्षय आरबाड,सुदाम आरबाड,गणेश आरबाड, यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार पत्रकार सिद्धेश्वर गिरी यांनी मांडले तर प्रास्ताविक शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाळासाहेब आरबाड,यांनी केले.


COMMENTS