प्रतिनिधी - महेंद्र पुरी, हिंगोली
मागिल काही दिवसांपासुन नांदेड परिक्षत्राचे डिआयजी निसार तांबोळी यांच्या आदेशावरून परिक्षत्रातील चारही जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाई चा धडाका सुरूच आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई ची मोहीम राबविण्यात येत आहे. अशाच प्रकारे कुरूंदा पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याची बातमी छापल्या चा राग मनात धरून ठाणेदारांने चक्क एका पत्रकाराला मारण्याची धमकी दिली होती. व अवैध धंद्याची बातमी छापल्या मुळे पोलिसांची प्रतीमा मलीन झाल्याची नोटीस सदर पत्रकाराला बजावली होती. मात्र त्याच ठाणेदारांनी आज कुरूंदा हद्दीत अवैध दारू विक्रीवर कारवाई केली आहे. या कारवाई वरूनच कुरूंदा पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध दारू विक्री बरोबरच दारू सप्लाय बिनबोभाट सुरू असल्याचे दिसुन येत आहे.
कुरूंदा ते टोकाई मार्गावरील एका हार्डवेअर दुकाना समोर बसस्थानक परिसरात इंडिका व्हीस्टा कार पोलिसांनी पकडली असून या कारमध्ये संत्रा भिंगरी देशी दारू असे लेबल लावलेले देशी दारूचे तब्बल 28 बॉक्स कार मध्ये मिळाले ज्याची किंमत 80 हजार 640 रुपये आहे. व तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीची एक कार सुद्धा जप्त केली असून असा एकुण 4 लाख 30 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. विनापरवाना बेकादेशीररित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करतांना सदर कारचालकास कुरूंदा पोलिसांनी अटक केली आहे. सदर कारवाई कुरूंदा पोलिस ठाण्याचे सपोनि सुनील गोपीनवार यांनी रात्री उशीरा केली आहे. या प्रकरणी कुरूंदा पोलिस ठाण्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईतुनच हे सिद्ध होत आहे कि कुरूंदा पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध धंदे सुरू आहेत. पत्रकाराने बातमी प्रकाशीत केल्यानंतर कुरूंदा पोलिसांची प्रतीमा मलीन झाली होती मग आता दस्तुर खुद्द कुरूंदा ठाणेदारांनी चक्क अवैध दारू वर एवढी मोठी कारवाई केली आहे. या कारवाई ने कुरूंदा पोलिसांचे अवैध धंदे बंद असल्याचे बिंग फुटले असुन आता प्रतिमा मलीन झाली नाही का? असा प्रश्न सुजाण नागरिक उपस्थित करीत आहेत. पत्रकाराला हातपाय तोडण्याची धमकी देऊन चौथ्यास्थभांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या करुंदा ठाणेदाराची नांदेड परिक्षत्राचे डिआयजी तांबोळी व पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या कडे सदर पत्रकाराने लेखी तक्रार सादर केली असुन आता या ठाणेदारावर कर्तबगार डिआयजी तांबोळी व जिल्हा पोलिस अधीक्षक कलासागर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS