नायगांव / प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याचे प्रात्यक्षिक माहिती उपविभागीय अधिकारी सोनटक्के, तालुका कृषी अधिकारी शिंगाडे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना देण्यात आली.
नायगांव तालुका कृषी विभागामार्फत आयोजन करण्यात आले होते.
तालुका कृषी विभागामार्फत प्रायोगिक तत्त्वावर श्री.दिलीप मोरे व श्री बळवंत मोरे यांच्या शेतात सह
अनेक शेतकऱ्यांच्या शेतीवरी पाहणी करण्यात आली आहे
एका शेतकऱ्याला एक संरक्षण किट देऊन पूर्ण प्रात्यक्षिक सांगून त्याची संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिली .यावेळी बी.एस. एफ.कंपनीचे कर्मचारी श्री शहादत्त गिरि यांनी कंपनीतर्फे शेतकऱ्यांना संरक्षण किट भेट दिली.
यावेळी या सदरील कार्यक्रमास उपस्थित तहसीलदार श्री.गजानन शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी देगलुर श्री.एम. के. सोनटक्के, तालुका कृषी अधिकारी श्री.बी.एस. शिंगाडे, मंडळ कृषी अधिकारी श्री. टी. जी. सुगावे,कृषी सहाय्यक श्री. जे.ए.पाटील, आर.जी.भुताळे, इरफान शेख, बी. टी.एम. अरुण पवार तसेच पळसगाव चे मा. सरपंच शिवाजी पाटील शिंदे सरपंच प्रतिनिधी साहेबराव कांबळे,उपसरपंच दत्ता पाटील शिंदे प्रगतिशील शेतकरी धोंडीराम सुपारे, बळवंत पाटिल मोरे.लोकमत तालुका प्रतिनिधी रामकृष्ण मोरे,गजानन पाटील चव्हाण. बळवंत बेंद्रे, साहेबराव मोरे, दिगंबर आकले,सुभाष मोरे,सुधाकर मनुरकर व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी बोलतांना कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना फवारणी करतांना डोळ्याच्या संरक्षफवारणी करतांना शेतकऱ्यांनी विविध बाबींवर काळजी घेण्याचे उपविभागीय अधिकारी सोनटक्के यांनी आवाहन केली.

COMMENTS