भाईंदर ( पूर्व ) : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन ( बाटा ) च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त रविवार ( दि.०१ ) रोजी धम्मरत्न बुध्दविहारात नूतन विद्यालय , सेलू येथील सहशिक्षक सुरेश हिवाळे यांचे ' अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील समतेचा विचार ' याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना सुरेश हिवाळे म्हणाले की , ' साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या वास्तववादी कथा, कादंबरी, लोकनाट्य, पोवाड्यातून समतेचा विचार मांडला. कामगार , उपेक्षित , वंचित, स्त्रियांवरिल अन्यायाला वाचा फोडली. आपल्या न्याय, हक्कासाठी संघर्ष करणारे स्वाभिमानी नायक - नायिका साहित्यात ऊभे करून वंचित समाजाला त्यांनी जगण्याच आत्मभान दिले. अण्णाभाऊंनी सर्व प्रकारच्या विषमते विरूध्द बंड केले. माणसांवर निस्सिम प्रेम करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे देश विदेशातील सत्तावीस भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. आपल्या प्रतिभेच्या बळावर रशियाला गेलेले अण्णाभाऊ साठे हे वैश्विक साहित्यिक होते. ' असे प्रतिपादन सुरेश हिवाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.एन. काॅलेजचे गणित विषयाचे विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र व्हटकर होते. प्रमुख वक्ते म्हणून सुरेश हिवाळे ( सेलू ) तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी अरूण चव्हाळ ( परभणी ) , तुकाराम झोंबडे , राजकुमार कांबळे , सुरेश शिंदे , बालाजी घुमाडे यांची उपस्थिती होती. परभणी येथील कवी अरुण चव्हाळ यांनीही कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की , ' लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार विज्ञानवादी आहे. त्यांनी सर्व अनिष्ट प्रथा नाकारल्या. ते सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी साहित्याच्या माध्यमातून दुर्बलांचा आवाज झाले. ' कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. उत्तम भगत यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. राजेश कणेरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा.सुनिल धापसे यांनी केले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड, दि. ३ जुलै : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २ जुलै २०२६ रोजी नांदेड येथे शालेय पोषण आहाराची तपासणी...
-
नांदेड, दि. २ जुलै : नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधि...
-
नांदेड, दि. 2 जुलै _ : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने भर पावसात आज धरणे आ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड, दि. ३ जुलै : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २ जुलै २०२६ रोजी नांदेड येथे शालेय पोषण आहाराची तपासणी...
-
नांदेड, दि. २ जुलै : नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधि...
-
नांदेड, दि. 2 जुलै _ : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने भर पावसात आज धरणे आ...
-
नांदेड:( दि. २ जुलै २०२६) यशवंत महाविद्यालयात एनसीसी कक्षाच्या वतीने कॅडेट्सना बी आणि सी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सोह...
-
श्रीक्षेत्र माहूरमाहुर शहरातील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानाचे हप्त्याची रक्कम आजतागायत मिळाली नसल्याने घरकुलाची ...

COMMENTS