नायगाव प्रतिनिधी
..................................
सत्यशोधक डॉ.अण्णाभाऊ साठे हे उपेक्षित माणसाच्या व्यथा जाणून आपल्या साहित्यात शेतकरी कष्टकरी वर्गाला न्याय देण्याची भूमिका बजावली. त्यांच्या घामाचा योग्य मोबदला न्याय व्यवस्थेकडून मिळण्यासाठी त्यांनी संघर्ष केला आहे, म्हणून ते शोषितांचे दिशादर्शक होते असे परखड मत शाहीर माधव बैलकवाड यांनी आयोजित जयंती कार्यक्रमात व्यक्त केले.
तालुक्यातील मौजे लालवंडी येथे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची जयंतीच्या आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी चेअरमन शेषराव पा. शिंदे तर सरपंच युवराज पाटील लालवंडे, शेळगाव छत्रीचे सरपंच जळबा वाघमारे, निष्ठावंत कार्यकर्ते गणपत रेड्डी, बळवंत पा. शिंदे, तं. अध्यक्ष सुभाष सावकार, उपसरपंच राजेश जोंधळे, भीमराव पाटील संगेपवार, गजानन गुरुपवार, शिवाजी पा जाधव, दादाराव पाटील, पत्रकार मारुती कोंपलवार, प्रकाश केरुरे, यांची उपस्थिती होती.
प्रारंभी माजी सरपंच बाबाराव इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थित गाव पदाधिकारी व पाहुण्यांनी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गणपत रेड्डी यांनी या काळातील दलित वर्गा पुढील आव्हाने याविषयी मार्गदर्शन केले.
शाहीर बैलकवाड बोलताना पुढे म्हणाले की, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, संत गाडगेबाबा, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे विचार मानवतावादी होते, त्यांचा जीवन काल समानतेची शिकवण देणारा होता. म्हणून त्यांची जात घेऊन चालण्यापेक्षा त्यांचे प्रगल्भ विचार घेऊन पुढे जाणे गरजेचे ठरते, ही काळाची गरज आहे असे ते म्हणाले.
यावेळी मोहन पा. जाधव, माधव पिलगुंडे, संजय इंगळे, मोहन इंगळे, नागोराव जोंधळे, अमृत इंगळे, मारुती इंगळे यासह महिला पुरुषांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम इंगळे सर यांनी केले तर आभार अमृत इंगळे यांनी मानले.

COMMENTS