मुसळधार पावसामुळे चिपळूण व महाड येथे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. लोकांची जनावरे, गाड्या, घरातील सर्व सामान या महापुरात वाहून गेले. अंगावर जी कपडे असतील तीच काय शिल्लक राहिली. सरकारची मदत कधी कधी तळागाळापर्यंत पोहचत नाही. अशा वेळेस कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची नॅशनल युनियन सीफेरर्स ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी अब्दुल गनी सारंग यांची नेहमीच तयारी असते. त्यानुसार चिपळूण शाखेच्या वतीने एक मदतीचा हात म्हणून चिपळूण व महाड येथील पूरग्रस्त सीमेन्स कामगार व त्यांच्या कुटुंबांना ताबडतोब पिण्याचे पाणी, बेडशीट, ब्लॅंकेट, अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. ज्या पूरग्रस्त सीमेन्स कामगारांना अद्याप मदत मिळाली नसेल त्यांनी चिपळूण शाखेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, अशी माहिती नुसीचे असिस्टंट जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर यांनी दिली.
आपला
मारुती विश्वासराव

COMMENTS