स्वातंत्र्य सैनिक, मुंबईचे माजी महापौर, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल यांचे नाव मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ऑरेंज गेट जवळील पी डीमेलो रोड व मॅलेट बंदर रोड जेथे मिळतो, त्या चौकाला डॉ. शांती पटेल यांचे नाव द्यावे, अशी मागणी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ऍड. एस. के. शेट्ये व जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी प्रभाग क्रमांक २२३ च्या नगरसेविका कु. निकिता निकम यांच्यामार्फत मुंबई महानगर पालिकेकडे केली होती. या मागणीचा पाठपुरावा युनियनचे उपाध्यक्ष निसार युनूस सातत्याने केला. त्यानुसार बी विभागातील प्रभाग क्रमांक २२३ मधील पी. डिमेलो रस्ता व मॅलेट बंदर रस्ता, रेल्वे लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाजवळ जेथे एकमेकांना छेदतात, तेथे तयार होणाऱ्या इंग्रजी टी आकाराच्या चौकास " कामगार नेते व स्वातंत्र्य सैनिक डॉ. शांती पटेल चौक" असे नाव देण्याबाबतचा ठराव मुंबई महानगर पालिकेच्या १३ जुलै २०२१ रोजी झालेल्या सभेत ठराव क्रमांक ४५७ अन्वये मंजूर करण्यात आला आहे. असे पत्रक बी विभागाचे सहाय्यक अभियंता यांनी २७ जुलै २०२१ रोजी युनियनला पाठविले आहे. डॉ. शांती पटेल चौकाला मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिल्याबद्दल माजी केंद्रीय नौकानयन मंत्री मा. मिलिंद देवरा व आमदार मा. अमीन पटेल यांनी आनंद व्यक्त केला. डॉ. शांती पटेल यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन " डॉ. शांती पटेल चौक " नाव
मंजूर केल्याबद्दल नगरसेविका कु. निकिता निकम यांना युनियनतर्फे धन्यवाद.
आपला विश्वासू
मारुती विश्वासराव
प्रसिद्धिप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

COMMENTS