धर्माबाद (अहमद लड्डा) दैनिक एकमत तसेच एन. टी.व्ही. चे धर्माबाद तालुका प्रतिनिधी माधव हनमंते यांना त्यांच्या विशेष वृत्तसंकलनामुळे नुकताच एन टीव्ही रत्न पुरस्कार मुख्य कार्यालय अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला.
एन टीव्ही च्या 19 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दिनांक 31 जुलै 2019 रोजी प्रतिनिधी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एन टीव्ही च्या प्रतिनिधींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्रातील 36 जिल्हे व सर्व तालुके असे एकूण 180 प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे अध्यक्ष एन टीव्ही चे मुख्य संपादक इक्बाल शेख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा ब्युरो चिफ सचिन बिद्री, पुणे ब्युरो चीफ अनिल सोनवणे हे होते.
तळागाळातील लोकांना वृत्तवाहिनीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व पत्रकारांचा सन्मान व्हावा, त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास नांदेड जिल्ह्यातून धर्माबाद तालुक्यासाठी माधव हनमंते यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा एन टीव्ही अभिमान पुरस्कार व एन टीव्ही अभिमान रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार वृत्तनिवेदिका गीता भारद्वाज यांनी केले.
हा सन्मान मिळाल्याबद्दल धर्माबाद येथील ज्येष्ठ पत्रकार जी. पी मिसाळे, संजय कदम, सुदर्शन वाघमारे, गंगाधर धडेकर, राहुल भुतनरे, गंगाधर लव्हाळे, शेख सलीम व तेलंगणा राज्यामधील एम साली म्हैसूर. डॉ.गंगाधर लव्हाळे सिंहनाद युवक प्रतिष्टान चे अनुप सेठजी कासलीवाल. नरेश शिलावार चैतन्य सोनी व सर्व टिम इत्यादींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS