* नांदेड (विठ्ठल कल्याणपाड) जिल्हा परिषद हायस्कुल देगलूर येथिल माध्यमिक शिक्षक श्री.रमाकांत लक्ष्मणराव मोतेवार सर दि.३१ जुलै रोजी सेवानि...
*
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
जिल्हा परिषद हायस्कुल देगलूर येथिल माध्यमिक शिक्षक श्री.रमाकांत लक्ष्मणराव मोतेवार सर दि.३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा वासवी कर्मचारी व अंबुलगा गावकर्याच्यावतीने नगरेश्र्वर मंदिरात निरोप निमित्त भव्य असा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुखेड पंचायत समितीचे माजी सभापती बालाजीराव पाटील अंबुलगेकर तर प्रमुख पाहूणे माजी आमदार सुभाषराव साबणे,माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पद्दमवार,शिक्षकसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोषराव अंबुलगेकर,शिक्षकसेनेचे मराठवाडा संघटक विठ्ठल देशटवाड, तसेच विविध संघटेनेचे पदाधिकारी,मुख्याध्यापक,शिक्षक,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशिनाथराव मोतेवार तर सुत्रसंचालन व्यंकट कल्याणपाड यांनी केले.बेजगमवार सर यांनी आभार मानले.

COMMENTS