नायगांव / प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
नायगांव शहरातील सामाजिक नेते कै.बाबूराव (ईरबा ) वडपत्रे यांच्या पहिल्या पुण्यतिथी दिनी तहसील कार्यालयाच्या व पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात जनतेची सेवा करण्याच्या उदात्त हेतूने वडपत्रे कुटुंबीयांनी सिमेंट काँक्रीट च्या खुर्च्या प्रत्येक झाडाखाली बांधून देऊन त्याचे दि.29 जुलै 2021रोजी शिवराज पा. होटाळकर, बालाजीराव बच्चेवार, श्रावण पा. भिलवंडे यांच्या हस्ते नायब तहसीलदार श्री नवनाथ वगवाड व पंचायत समिती चे बिडीओ श्री फांजेवाड साहेब देविदासराव पा. बोमनाळे,जेष्ठ पत्रकार सुर्यकात सोनखेडकर यांच्या उपस्थितीत लोकार्पन करण्यात आले.कै बाबुराव वडपत्रे यांच्या सामाजिक कार्याला शिवराज पा. होटाळकर, बालाजी बच्चेवार,श्रावण पा.भिलवंडे. कोंडीबा पा.शिदे. गजानन चव्हाण. पत्रकार सोनखेडकर सह मंचावरील नेते मंडळींना आठवणी सांगताना गहिवरून आले होते.समाजाच्या सुखदुःखात प्रत्यक्ष सहभागी होणारा सच्चा हिरा गमावल्याची दुख: नेते मंडळी सह जनतेनी व्यक्त करीत बाबूराव वडपत्रेंना विनंम्र आदरांजली वाहण्यात आली. या लोकार्पन सोहळ्यास सचिन पा. बेंद्रीकर,चंद्रकांत पा. चव्हाण,गंगाधर पा. कल्याण,आशोकराव पा. चव्हाण, गजानन पा. चव्हाण, शिवाजीराव वडजे,सुर्यकांत कल्याण. पत्रकार गजानन चौधरी,माधव चव्हाण. बालाजी नागठाणे.गंगाधर गंगासागरे. मतिन मुदखेडकर. कैलास तेलंग. व निलेश बिरेवार.सोनकांबळे. मावले सर खङके.सह वडपत्रे कुंटूबांचे नातलग,वडपत्रे कुटूंबीयावर प्रेम करणारे सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते उपस्थित होते.हा सोहळा वडपत्रे परिवाराकडून घडवून आणला..

COMMENTS