सोनपेठ/प्रतिनिधी पाथरी तालुक्यातील वाघाळा येथून जवळच असलेल्या आदिवासी समुदायाच्या वसाहतीवर रस्ता नसल्याने रस्त्याअभावी एका युवकाला आपला जीव ...
सोनपेठ/प्रतिनिधी
पाथरी तालुक्यातील वाघाळा येथून जवळच असलेल्या आदिवासी समुदायाच्या वसाहतीवर रस्ता नसल्याने रस्त्याअभावी एका युवकाला आपला जीव गमवावा लागला होता.त्या युवकाच्या कुटुंबियांचे सांत्वन पाथरीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीकांत निळे यांनी केले.विशेष म्हणजे ज्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नाही त्या वस्तीवर तहसीलदार निळे यांनी स्वतःएका शेतकऱ्यांच्या भूमिकेत बैलगाडी चालवत वस्ती गाठत त्या मयताच्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला आहे.मागील एका वर्षांपासून रुजू झालेल्या निळे यांनी तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला न्यायाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे दाखवून दिले आहे.यात सामान्य शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी बँकेला कडक आदेश देऊन निळे कार्यरत आहेत या धाडसी तहसीलदाराचे तालुक्यातुन आभार मानले जात आहेत.

COMMENTS