राम दातीर
श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी )माहूर तालुक्यातील लांजी शिवारात दि.29 जुलै रोजी स.10 वाजताचे सुमारास जमादार विजय आडे यांना अवैध रीत्या वाळूची वाहतूक करणारा एम.पी.09 जी.ई.7785 क्रमांकाचा ट्रक आढळून आला.त्यांनी अधिकची चौकशी केली असता चालकाजवळ यवतमाळ जिल्हयाचा रॉयल्टी परवाना असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तो ट्रक पोलीस स्टेशनला आणून लावला.
चालू वर्षासाठी महसुल प्रशासनाने माहूर तालुक्यातून वाहणा-या पैनगंगा नदीतील 8 वाळू घाटा पैकी केवळ लांजी या एकाच घाटाचा लिलाव केला.त्यामुळे रेती तस्करांचे फावले.त्यांनी उर्वरित घाटातून चोरट्या मार्गाने वाळू उपसा करून मोठया प्रमाणात विक्री तर केलीच,शिवाय तेवढ्याच प्रमाणात साठवणूकही केली.
स.पो.नि.नामदेव मद्दे यांना मिळालेल्या माहिती वरून त्यांनी जमादार विजय आडे व पो.कॉ.चंद्रप्रकाश नागरगोजे यांना दिलेल्या आदेशानुसार त्या दोघांनी ट्रक पकडून पोलीस ठाण्यात लावल्याने आजही राजरोसपणे अवैध मार्गाने वाळू उपसा करून त्याची वाहतूक केल्या जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.
या संदर्भात तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांचे कडून माहिती घेतली असता अद्याप पर्यंत माझ्याकडे अहवाल आला नसल्याचे तसेच माझ्या आदेशाशिवाय पोलीसांना तो ट्रक सोडता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.अधिक माहितीसाठी स.पो.नि.मद्दे यांचेशी संपर्क केला असता
*सदर प्रकरणी तहसीलदाराकडून मार्गदर्शन घेण्याची प्रक्रीया सुरू आहे,असे त्यांनी सांगितले.*

COMMENTS