नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार)
राज्यातील कोकण सांगली, कोल्हापूर याभागात मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊन अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक घरांची पडझड होऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तसेच अनेक ठिकाणी शेतीचे अतोनात नुकसान झाले असून पुरामध्ये पूर्ण शेती वाहून गेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे, अशा पूरग्रस्त भागातील जनतेला मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हात मदतीचा हे अभियान घेत या अभियानाद्वारे मदत रॅली काढून जनतेकडून मदत घेऊन ती मदत पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.
त्याचाच एक भाग म्हणून नायगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने नायगांव येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील, व राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगांव तालुकाध्यक्ष भास्कर पा. भिलवंडे यांच्या नेतृत्वाखाली नायगांव शहरात रॅली काढून मदत जमा करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष मारोतराव कदम ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नायगांव तालुकाकार्याध्यक्ष श्याम चोंडे, विश्वनाथ बडुरे,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल सातेगावकर,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाचिटणीस पंढरी डाकोरे,माधव कोरे, दिलीप वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष केरबा रावते,माधव बेंद्रीकर, राजेश ढगे , गजानन पवार, योगेश ढगे बाबु साब. यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

COMMENTS