नांदेड.(विशेष प्रतिनिधी) नांदेडच्या 'सिडको' परिसरातील 'ओजस' मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने २९ जुलै रोजी गरोदर माता व अन्य महिलांकरिता 'मोफत'आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले असून,या शिबिरास सिडको-हडको भागातील महिला रूग्णांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
नांदेडच्या 'सिडको' परिसरातील बळीरामपूर, गोपाळचावडी, तुप्पा व गुंडेगावसह असदवन, वाघाळा, बाभुळगाव, काकांडी, वाजेगाव आणि वडगाव आदी ग्रामीण भागातील गरोदर मातांसह अन्य सर्व सामान्य महिलांच्याही आरोग्याची काळजी घेण्याच्या हेतूने ओजस 'मल्टीस्पेशालिटी' हॉस्पिटलच्या वतीने २९ जुलै रोजी एक दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात स्त्रिरोग- प्रसुतीशास्त्र विशेषतज्ज्ञ डॉ. जयसिंग, डॉ.विरेश बिराजदार, डॉ.माधूरी शेळके, डॉ.भास्कर डी.औराळकर तसेच त्यांच्या अन्य सहकारी डॉक्टर मंडळींनी ३५ गरोदर मातांसह अन्य ५० ते ६० महिलांची आरोग्य तपासणी केली. त्याचवेळी, डॉ. जयसिंग, डॉ. विरेश बिराजदार,डॉ. माधूरी डाढाळे - शेळके आणि डॉ.भास्कर औराळकर आदींनी महिलांच्या विविध आजारांविषयी मार्गदर्शन केले. याशिवाय,डॉ. जयसिंग व डॉ. माधुरी शेळके यांनी महिलांचे विविध आजारांसह प्रसुतीपुर्व व प्रसुतीपश्चात तपासण्या यासंदर्भात उपस्थित गरोदर महिलांना विस्तृतपणे मार्गदर्शन केले.
विशेष बाब म्हणजे, ओजस 'मल्टीस्पेशालिटी' हॉस्पिटलमध्ये २९ जुलै रोजी घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात सिडको- हडको परिसरातील तब्बल ३५ गरोदर महिलांसह अन्य ५० ते ६० सामान्य महिलांचीही मोफत तपासणी करण्यात आली. त्याचवेळी, आरोग्य तपासणी शिबिरातील सर्व महिला रूग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात आली आहेत.शिबिराच्या यशस्वीतेकरिता 'ओजस' मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापक प्रविण सोनसळे, मनोज कांबळे, राहूल कंधारे व प्रतिक हनवते यांच्यासह अधिपरिचारीका पूजा कोकरे, सुजाता पंडीत,दिक्षा डुमणे तसेच आम्रपाली वाघमारे तसेच त्यांचे सर्व सहकारी नर्स आणि कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.


COMMENTS