नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार)
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा नायगांव बाजार जिल्हा नांदेड येथील तालूका पातळीवरीत बैठक अंनिसचे राज्य कार्यकारीणी सदस्य सम्राट हटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून या बैठकीत तालूका अध्यक्षपदी माजी प्राचार्य ह. स. खंडगावकर तर कार्याध्यक्षपदी प्रा.डॉ. शंकर गड्डमवार यांची एकमताने निवड करण्यात आली. पुढील कार्यकारीणी अशी उपाध्यक्ष - प्रा.डॉ. बलभीम वाघमारे, प्रधान सचिव -भाऊराव मोरे, कायदेविषयक सल्लागार -अँड. बापूराव वाघमारे, विविध उपक्रम कार्यवाह- प्रा.डॉ. संजय भालेराव, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प कार्यवाह - मल्हारी तोटरे, साहेबराव जाधव, बुवाबाजी संघर्ष कार्यवाह- प्रा.बालाजी गायकवाड कोकलेगावकर, सांस्कृतिक अभिव्यक्ती कार्यवाह- शाहीर दिगू तुमवाड, प्रकाशने वितरण कार्यवाह-प्रा.डॉ. गोविंद परडे, दिंगबर रेडेवाड, युवा सहभाग कार्यवाह-बोयाळ नागोराव, हणमंत ढगे, महिला सहभाग कार्यवाह- प्रा डॉ. संजिवनी वाडेकर, सौ. संगिता उपलवार, प्रशिक्षण विभाग कार्यवाह- प्रा.डॉ.के. हरीबाबू, जातीअंत संकल्प विभाग - पत्रकार माधव बैलकवाड, मानसिक आरोग्य विभाग कार्यक्रम -डॉ. संतोष खंडगावकर आणि सोशल मिडीया व्यवस्थापन -डॉ.बी.आर. लोकलवार, श्रीपत ढगे या सर्वांची एकमताने निवड करण्यात आली.
बैठकीच्या सुरुवातीस शिवाजी पिटलेवाड यांनी प्रास्ताविकामध्ये अंनिसची भूमिका मांडली. अंनिस समोर अनेक नवनवीन आव्हाने उभी केली जात आहेत धर्माच्या नावावर सामान्य जनतेची दिशाभूत करुन त्यांचे शोषण केले जात आहेत. त्यामुळे अंनिसचा कार्यकर्ता दिशाभूल करणाऱ्या लोकापासून व परंपरापासून जागरूक राहुन जनतेची अंधश्रध्दाविरूध्द मने घडविणे अत्यंत गरजेचे आहे. अंनिसचा देव व धर्म याविरुद्ध विचारधारा कधीच नव्हती व यापुढेही राहणार नाही पण धर्माच्या व देवाच्या नावावर होणाऱ्या शोषणाला विरोध करते. असे पिटलेवाड यांनी म्हणाले. अध्यक्षीय समारोपामध्ये इंजि.सम्राट हटकर यांनी म्हटले की, अंनिसचे कार्य म्हणजे विज्ञानवादी कार्य आहे. हे कार्य कोणत्याही धर्माविरूध्द नसून सर्वच धर्मातील अनिष्ट प्रथा, परंपरा व रूढी कशा विज्ञानाच्या विरुद्ध आहेत. बुवाबाजी करणारे लोक कसे जनतेची दिशाभूल करून त्यांचे शोषण करतात याबाबत सांगितले. समाज विज्ञानवादी बंनला तर देश सक्षम बनेल असही ते म्हणाले. यावेळी कमलाकर जमदाडे यांनीही आपले विचार मांडले. कार्यकारीणीच्या निवडीनंतर हमीद दाभोळकर यांनी फोनवरून सर्वांचे अभिनंदन केले. आपण सर्वांनी एकत्र मिळून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केल्यास निश्चितच चळवळ गतिमान होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
बैठकीमध्ये निवड झालेल्या अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

COMMENTS