नांदेड. (विशेष प्रतिनिधी) नांदेडच्या 'हडको' परिसरातील रहिवासी तथा उस्माननगर येथील जि. प. कें. प्रा. शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त मु...
नांदेड. (विशेष प्रतिनिधी) नांदेडच्या 'हडको' परिसरातील रहिवासी तथा उस्माननगर येथील जि. प. कें. प्रा. शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक जयवंतराव काळे पाटील यांच्या मातोश्री तसेच वडगाव येथील जेष्ठ नागरिक सुभद्राबाई संभाजीराव काळे पाटील (वय-८५ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने ३ मे रोजी दुपारी राहत्या घरी निधन झाले.
दिवंगत सुभद्राबाई काळे पाटील यांच्या पार्थिव देहावर मंगळवार दि. ४ मे रोजी दुपारी १२ वाजता नांदेड ते उस्माननगर मुख्य रस्त्याशेजारील लोहा तालुक्यातील वडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, पाच मुले, सुना, एक मुलगी, जावई, नातू व पणतू असा मोठा परिवार आहे. वडगाव येथील प्रतिष्ठित नागरिक संभाजीराव काळे पाटील यांच्या 'त्या' पत्नी होत.

COMMENTS