लोकार्पण सोहळा.
जनसेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे सार्वजनिक व सामाजिक जीवनात सर्वसामान्यांच्या हिताची जोपसना करण्यासाठी अविरत झटणारे हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय नेतृत्व आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे बांधकाम मंत्री नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या आमदार निधीतून हदगाव तालुक्यातील तामसा, वायफना, आष्टी, बरडशेवाळा, निमगाव तसेच हिमायतनगर तालुक्यातील सरसम व चिंचोर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका खरेदी करून उपलब्ध केल्या आहेत. हदगाव तालुक्यातील अजून एका प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आपत्ती व्यवस्थापनातून एक रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे. कोरोना महामारीच्या संकटामध्ये मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी करीत रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्ययावत अवस्थेतील रुग्णवाहिका उपलब्ध केल्याने रुग्ण व सर्वसामान्यांची आरोग्यविषयक मोठी सोय होणार आहे. या सात रुग्णवाहिकांचा छोटेखानी लोकार्पण सोहळा कोरोना नियमांचे पालन करीत आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या शुभहस्ते दिनांक दोन मे रोजी ( रविवारी) तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये झाला आहे. सातही प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णांची रुग्णवाहिकेबाबतची मोठी गैरसोय दूर केल्याबद्दल आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे धोनी तालुक्यातील जनता व आरोग्य विभागाकडून आभार व्यक्त होत आहेत.

COMMENTS