नायगांव / प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार )
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये लाईनमॅन म्हणून तब्बल 32 वर्ष सेवा बजावणारे येथील सय्यद मैनोद्दीन मुरादशहा हे काल दि. 30 एप्रिल 2021 रोजी वयाच्या ६० व्या वर्षी सेवानिवृत्त झाले असून त्यांचा नरसी येथील 33 के.व्ही उपकेंद्रात सपत्नीक सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.
त्यांच्या या छोटेखानी निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायगांव चे सहाय्यक अभियंता सुरेश गंदे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून शाखा अभियंता बळवंत बोधनकर,शाखा अभियंता भाये,महावितरणचे कंत्राटदार आष्टे,पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल हे व्यासपीठावर उपस्थित होते.लाईनमॅन सय्यद मैनुद्दिन मुरादशाह हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये तब्बल बत्तीस वर्ष कार्यकुशलपणे सेवा बजावली.त्यात त्यांनी नांदेड येथील चौफाळा,नायगांव,नरसी येथील सबस्टेशन मधील अनेक गावात कर्तव्य बजावत असतांना ग्राहकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले.तर ग्राहकांना येणाऱ्या समस्या तत्पर्याने सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घ्यायचे आणि विज बिलचे देयके स्वतः भरून घेऊन ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी केल्याची भावना अनेकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
नरसी ता.नायगांव येथील ३३ के.व्ही उपकेंद्रात त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल दि. 30 एप्रिल रोजी छोटेखानी निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला.व सय्यद मैनोदीन यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी शाखा अभियंता बळवंत बोधनकर आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की,लाईनमॅन सय्यद मैनोदीनसाब हे ३२ वर्ष सेवा बजावून वयाच्या ६० व्या वर्षी दि.30 एप्रिल रोजी पवित्र रमजान महिण्यात सेवानिवृत्त होत आहेत.त्यांनी सामान्य जनतेसह आम्हा वरिष्ठ अधिकार्यांना ही सोबत घेऊन एवढे वर्ष विद्युत महामंडळाच्या हिताचे कार्य केले अडचणी घेऊन येणार्या ग्राहकांना समजुन घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न नेहमीच केले. त्यांचे कार्य न विसरणारे असून एक होतकरू आणि आमचा सहकारी व मार्गदर्शक सेवा निवृत्त होत आहे. त्यामुळे त्यांची उणीव नक्कीच भासेल अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली
या निरोप समारंभाच्या कार्यक्रमास सेवानिवृत्त लाईनमॅन शंकरमामा निलेवार,शेख अहेमदसाब,दिगंबर कल्लूरे,जी.आर.नांदुरकर,एम.व्ही.टोकलवाड,व्ही.एस. कौठकर,एस.एम सूर्यवंशी,डी.पी.आळंदीकर,जी.एम रेडेस,वाय.वाय.शेख मॅडम,आर.एस.तेलंगे,पी.एम.चिवळे पी.एच.वडजे,डी.एम.गंजेवार,ए.एच.भद्रे,विकास सोंडारे, बालाजी कुर्णापल्ले, सचिन लोखंडे,शेख अकबर,मस्तान मिस्तरी,धम्मदीप भेदे,सय्यद अजहर, सय्यद इरफान यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

COMMENTS