देवणी/ प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नागराळ हे देवणी तालुक्यातील हॉटस्पॉट गाव म्हणून आळखले जाऊ लागले आहे नागराळ गावची एकूण लोकसंख्या 1000 च्या आत असताना स्थायिक संख्या 700 च्या वर आहे कोरोना बाधीत संख्या ही 49 असून नागराळ गावात रोज कोरोना टेस्ट घेतली जाते व ही संख्या रोजच वाढत चालली असल्याने दि 10 एफ्रील शनिवार रोजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी गावाला भेट दिली व प्रशासनाला या गावात 4 दिवसाच्या आत कोरोना बाधित संख्या कमी कसे करता येईल यावर आरोग्य विभागाला लवकरात लवकर प्रयत्न करण्यास सांगितले आहे
व तसेच गावातील व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत गावाबाहेर पडता कामा नये असे सांगितले,आरोग्य विभाग व गट विकास अधिकारी यांनी आश्वासन दिले आहे की सर्व कोरोना बाधित रुग्णांना नविन प्राथमिक आरोग्य केंद्र नागराळ येथे क्वारंटाइन केले जाईल त्यांची योग्य ती सोय करण्यात येईल
तहसीलदार यांनी सांगितले कि नागराळ येथेच नाही तर संपूर्ण देवणी तालुक्यात अँटी कोरोना फोर्स पुन्हा सुरू करून कोरोनाला परत आटोक्यात आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू असे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी सांगितले
ग्रामसेवक, तलाठी, आशाकार्यकर्ती यांना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी ताकीद दिली की गावात जी व्यक्ती नियम पाळले जात नाही अश्या व्यक्ती ला प्रशासनाने लागू केलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात यावी, यावेळी नागराळ गावचे भूमिपुत्र मा श्री बसवराज पाटील नागराळकर यांनी आलेल्या मंत्रीमहोदय व सर्व प्रशासनाचे आभार व्यक्त केले यावेळी उपस्थित माजि जि.प.सदस्य दिलीप पाटील नागराळकर, तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, वैद्यकीय अधिकारी पांडुरंग कलंबरकर,देवणी पोलीस प्रशासन,ग्रामसेवक ईश्वर मूर्के, तलाठी आनिता निगुळे,सरपंच विष्णू ऐनिले, उपसरपंच रतन पाटील,यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते !

COMMENTS