बालाजी पाटील
सध्या चालू असलेल्या कोरोनाच्या महामारीच्या काळात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.कोरोनाच्या वाढत्या फैलावाला आळा घालण्यासाठी शासन स्तरावरही बरेच प्रयत्न सुरू आहेत.तसेच रुग्णालयात ही कोरोना रुग्णांची संख्या वाढत च चालली आहे.तसे च काही कोरोनाचे रुग्ण गंभीर असून,त्यांना मोठ्या प्रमाणात रक्ताचीही गरज भासत आहे.यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे.त्यामुळे रक्ताची गरज जास्त प्रमाणात भासत आहे.यामुळे रक्तपेठ्या मध्ये रक्तपुरवठा कमी पडत आहे.जाहूर ता.मुखेड येथे सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने व माननीय रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य रक्तदान शिबीर राजे संभाजी महाराज चौक जाहूर ता.मुखेड येथे ता १२ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त युवकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे असे आवाहन माननीय रामदास पाटील सुमठाणकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS