माजलगाव ( प्रतिनिधी ) शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बाजार समितीने शेतकऱ्यांचे भाजीपाल्यासह फळांचे बिट सुरु करुन खरेदी करण्याच्या मागणीसाठी प्रशासनाने आंदोलनाला परवानगी नाकरल्याने मोठेवाडी येथील लिंबोनीच्या बागेत क्रांती सुर्य मा.फुले यांची जयंती साजरी करून मा.फुले यांच्या प्रतिमेच्या साक्षीने शासनाच्या निषेधार्थ भाजीपाला व फळे फेकून देत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला असुडाचे फटके देत असुड आंदोलन दि ११ एप्रिल रविवार रोजी दुपारी १२:३० वाजता करण्यात आले.
शेतकरी कामगार पक्षाच्या वतिने दि ११ एप्रिल रविवार रोजी शेतकऱ्यांच्या फळे व भाजीपाला बाजार समितीने बिट सुरु करुन खरेदी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा बाजार समिती व तहसील प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला होता, परंतु कोविड १९ च्या धर्तीवर पोलीस प्रशासनाने कलम १४९ प्रमाणे नोटीस देऊन असुड आंदोलनाला परवानगी नाकरल्याने शेकापच्या वतीने मोठेवाडी येथील लिंबोनीच्या शेतात दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास क्रांतिसुर्य मा.फुले यांची जयंती साजरी करुन,मा.फुले यांच्या प्रतिमेच्या साक्षीने प्रंचड घोषणाबाजी करत शेकापचे भाई अँड नारायण गोलेपाटील यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या निषेधार्थ फळे व भाजीपाला फेकून देत शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आसुडाचे फटके देत आसूड आंदोलन करण्यात आले, यावेळी लहु सोळंके, मुंजा पंचाळ, कडाजी नावडकर,रोहन आकुसकर,मोहन इंगळे,रंजित जाधव,आमोल गोले,भालचंद्र सोळंके, गणेश सोळंके व आभिजीत आठवे यांची उपस्थिती होती.

COMMENTS