सर्वच वैद्यकीय केंद्रात तपासणी व लसीकरणाला प्रतिसाद --------------------------------------------------- नांदेड - नांदेड वाघाळा शहर महानगरपाल...
सर्वच वैद्यकीय केंद्रात तपासणी व लसीकरणाला प्रतिसाद
---------------------------------------------------
नांदेड - नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत चालणाऱ्या आरोग्य केंद्रांना नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांनी विनायक नगर येथील रुग्णालयात जाऊन डॉ. पल्लवी तुंगनवार यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच शिवाजी नगर येथील रुग्णालयात डॉ. विजया जाधव तसेच व पोर्णिमा नगर येथील रुग्णालयात डॉ. श्रुती कोटलवार यांच्याकडून माहिती घेतली. या वेळी आ. बालाजी कल्याणकर यांनी मेडिकल भवनला देखील भेट दिली आहे. येथे देखील नागरिकांचे लसीकरण करण्याचे काम सुरू आहे. शहरातील प्रत्येक रुग्णालयात कोरोना तपासणी व लसीकरण करण्याचे काम सुरू आहे.

COMMENTS