सेलू : ( )करोना-१९ विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम नुसार शाळेत विद्यार्थी उपस्थित नसल्यामुळे शिक्षकांना सातोना व देवगाव फाटा चेकपोस्टवर तैनात करण्यात आले आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षकवर्गांच्या तीन टप्प्यात नियुक्त्या करण्यात आल्या. सलग सात दिवस नियुक्तीत, २४ ते ३० एप्रिल दरम्यान पहिल्या सत्रात सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत कृष्णा जोशी,नारायण सोळंके, राठोड कैलास, महादेव खरात, वैद्यकार, तर देवगाव फाटा चेकपोस्टवर शफी कुरेशी, घुलेश्वर शिवराज, घुगे सुदाम, चव्हाण संजय, दुसरे सत्र (दुपारी दोन ते रात्री दहा) पर्यंत परशुराम कपाटे, देविदास सोन्नेकर, गणेश माळवे, तर देवगांव फाटा - नागेश कान्हेकर, महेश कुलकर्णी, अजय उडेगांवकर, विजय चौधरी, तिसऱ्या सत्रात रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सतिश नावाडे, बाबासाहेब हेलसकर, सुधीर जोशी, भगवान देवकते, राजेंद्र सोनवणे, विलास खरात, सुभाष बिराजदार, दयानंद जामगे, प्रशांत देशपांडे, आसाराम मदने यांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यातील प्रवासी बाहेर जाऊ नये व बाहेरील जिल्ह्यातील प्रवासी आपल्या जिल्ह्यात येऊ नये या उपाययोजनासाठी आरोग्य अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांसह शिक्षकांनाही चेकपोस्ट वर तैनात करण्यात आले आहे. कोरोना काळात शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया पूर्ण करत असताना कोरोनाविषयक विविध कार्यात शिक्षक सहभागी झाले आहेत.
....

COMMENTS