नायगांव / प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार )
ग्रामपंचायत कार्यालय घुंगराळा येथे शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त घुंगराळा येथील ग्रामपंचायत मध्ये सर्व गावकऱ्यांच्या वतीने सरपंच प्रतिनिधी मोहनराव जोगेवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी यशवंतराव पा. ढगे, ग्रामपंचायत सदस्य गोविंद पांचाळ ,गंगाधर सूर्यवंशी ,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी व्यंकटी कंचलवाड,व प्रतिष्ठित नागरिक साहेबराव माली पाटील सुगावे (विस्तार अधिकारी ),आनंदराव यमलवाड कृषी अधिकारी ,दिगंबर पा सुगावे,पंडित पा सुगावे,शा. व्य. समिती अध्यक्ष माधव पा ढगे. सदाशिव पा ढगे , बळवंत बोंडले, बालाजी पा ढगे.(माजी चेअरमन),लक्ष्मण यमलवाड(माजी चेअरमन), कैलास बोंडले,खाज्यासाब शेख ,माधवराव पा ढगे, विलास पा ढगे, दिगंबर गंगासागरे,माधव गजभारे ,बाबाराव पा सुगावे, व गावकरी उपस्थित होते.

COMMENTS