धर्माबाद (अहमद लड्डा) पुज्य भदंत सत्यशिल थेरो यांचं दिनांक 23 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7:00 वा. श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे वृधापकाळाने निर्वाण झाले आहे. त्यांचा अंत्यविधी श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे दि. 24 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10:00 वा. करण्यात आले आहे.
सुरुवातीच्या काळात भदंत सत्यशील थेरो यांनी जवळपास पंधरा वर्षे धर्माबाद येथील फुले नगर मध्ये राहून येथील नागरिकांना तथागत भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सदधम्माची शिकवण दिली. फुले नगर येथील भदंत टेकडीवर असलेल्या भगवान बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्ती (पुतळे) उभारुन धर्माबाद तालुक्यात फुले नगर ची शान वाढविली. नालंदा बुद्ध विहार उभारण्यात ही त्यांचे मोलाचे योगदान होते. वर्षावासाच्या काळात भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तसेच मिलिंद प्रश्न यासारख्या पवित्र ग्रंथाचे वाचन करून उपासक-उपासिकांना उपदेश करीत होते. काही वर्षांपूर्वी पासून भदंत सत्यशील यांनी माळवटा ता. वसमत येथे वास्तव्य केले होते.
वसमत परिसरात पुज्यभंते सत्यशिल थेरो यांनी धम्मचळवळ गतीमान केली, बुध्दभुमी माळवटा येथे त्यांनी सतत धम्मपरिषदेच्या माध्यमातून लोकांमध्ये धम्म रुजवण्यांचे कार्य केले. अखेरच्याक्षणी पुज्य भदंत पय्याबोधी यांनी त्यांची एक वर्ष सेवा केली.
त्यानिमित्त आज दि. 24-4-21 रोजी सकाळी 10:30 वाजता नालंदा बुद्ध विहार धर्माबाद येथे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जी. बी. वाघमारे, पत्रकार सुदर्शन वाघमारे, भगवान कांबळे, प्रा. सुधाकर वाघमारे, बाबुराव वाघमारे, शंकरराव सोनटक्के, गौतम देवके, राहुल भुतनरे, शंकरराव कांबळे, शैलेंद्र वाघमारे, सुरेश गवळे, नगरसेविका महादाबाई वाघमारे, महिला मंडळाच्या सिंधुबाई वाघमारे, पुष्पाबाई वाघमारे, लिना वाघमारे, सुमनबाई कांबळे, शांताबाई सोनटक्के यांच्यासह अनेक बौध्द उपासक-उपासिका उपस्थित होते.

COMMENTS