नांदेड. (प्रतिनिधी) हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या सासूबाई व गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांच्या मातोश्री तथा यवतमाळ येथील महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष कै. बाबासाहेब महल्ले यांच्या पत्नी पुष्पाताई महल्ले यांचे कोरोना आजाराने मुंबई येथील जसलोक हॉस्पिटल मध्ये निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७२ वर्षे होते.
पुष्पाताई महल्ले यांची 'कोरोना' टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रविवार दि. १८ एप्रिल रोजी नांदेड येथील अपेक्षा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. औषधोपचार सुरू असूनसुद्धा त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नसल्याने आणि उपचाराला प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने जसलोक हॉस्पिटल, मुबंई येथे नेण्यात आले. सोमवारपासून उपचार सुरू असतानाच अचानक सकाळपासून तब्येत खालावली होती व उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यान, दि.२७ एप्रिल दुपारी ३ वाजेच्यादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगी राजश्रीताई पाटील, जावई हेमंत पाटील, पुतणे व नातवंडे असा मोठा परिवार आहे. दिवंगत पुष्पाताई महल्ले यांच्या पार्थिव देहावर मुंबई येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

COMMENTS