स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळ...
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सिनेट सदस्य उद्धव हंबर्डे, नारायण गोरे, रामदास खोकले, शिवाजी हंबर्डे, संदीप एडके, तुकाराम हंबर्डे, यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी कोव्हीड-१९ च्या संसर्गजन्य आजारारामुळे सामाजिक अंतराचे पालन करून प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

COMMENTS