*नेहमीच्या बंदमुळे व्यापारी हैराण*
सोनपेठ/प्रतिनिधी
पालकमंत्री नवाब मलिक यांनी परभणी जिल्ह्यातील वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दोनदिवसीय संचारबंदी जाहीर केली आहे.त्यानुसार जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांनी १२ मार्च रोजी पत्रक काढून जिल्ह्यातील नागरी भागात संचारबंदी जाहीर केली आहे.त्यानुसार सोनपेठमध्ये तुरळक दवाखाने आणि मेडीकल वगळता इतर प्रतिष्ठाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवत या बंदला प्रतिसाद दिला.या संचारबंदीत तहसीलदार डॉ. आशीषकुमार बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील प्रशासनाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवून या कोरोनासारख्या रोगाला हरवण्यासाठी मास्क,सोशल डिस्टन्सचा वापर करुन प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे तर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी सोनपेठमध्ये चोख बंदोबस्त ठेवून आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष पवार,ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सिद्धेश्वर हालगे,डॉ.विष्णू राठोड यांच्यासह आरोग्य कर्मचारी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.नेहमीच करण्यात येणाऱ्या संचारबंदीमुळे व्यापारी हैराण झाले असल्याचे दिसून येत आहे. व्यापारी हैराण*
सोनपेठ/प्रतिनिधी
पालकमंत्री नवाब मलिक यांनी परभणी जिल्ह्यातील वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दोनदिवसीय संचारबंदी जाहीर केली आहे.त्यानुसार जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांनी १२ मार्च रोजी पत्रक काढून जिल्ह्यातील नागरी भागात संचारबंदी जाहीर केली आहे.त्यानुसार सोनपेठमध्ये तुरळक दवाखाने आणि मेडीकल वगळता इतर प्रतिष्ठाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवत या बंदला प्रतिसाद दिला.या संचारबंदीत तहसीलदार डॉ. आशीषकुमार बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील प्रशासनाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवून या कोरोनासारख्या रोगाला हरवण्यासाठी मास्क,सोशल डिस्टन्सचा वापर करुन प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे तर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी सोनपेठमध्ये चोख बंदोबस्त ठेवून आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष पवार,ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सिद्धेश्वर हालगे,डॉ.विष्णू राठोड यांच्यासह आरोग्य कर्मचारी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.नेहमीच करण्यात येणाऱ्या संचारबंदीमुळे व्यापारी हैराण झाले असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS