सेलू : येथील नूतन विद्यालयात कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर अध्ययन व अध्यापन सहज सुलभ व्हावे या दृष्टीने शिक्षकांना अध्यापनासाठी सर्व सुविधांनीयुक्त ऑनलाईन क्लास रुम उपलब्ध करून देण्यात आली. सध्याच्या काळात पाचवी ते नववीच्या शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. या भुमिकेतून ऑनलाईन क्लास रूमचे उद् घाटन नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते शुक्रवार ( ता. १२ ) रोजी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी हे होते. तर या प्रसंगी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे , उद्योजक विनोद सांगतानी , माणिक डख, प्रशालेचे मुख्याध्यापक अशोककुमार वानरे , उपमुख्याध्यापक रामकिशन मखमले , पर्यवेक्षक रघुनाथ सोन्नेकर , नारायण सोळंके , प्रा. नागेश कान्हेकर , नंदकुमार बंगाळे यांची उपस्थिती होती. प्रशालेचे मुख्याध्यापक अशोककुमार वानरे यांनी मनोगतातून ऑनलाईन क्लास रूमसाठी शुभेच्छा दिल्या. या आॅनलाइन क्लास रूमचा उपयोग प्रशालेतील पाचवी ते नवविच्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विरेश कडगे यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. नागेश कान्हेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन गणेश माळवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर कटारे , सुरेश हिवाळे , विशाल क्षिरसागर , कुशल कडे , व्यंकट तोरणाळे , अनंतकुमार विश्वंभर , डॉ. काशिनाथ पल्लेवाड , शशांक पांडे यांनी पुढाकार घेतला.
*बॅडमिंटन एकेरी क्रीडा स्पर्धा संपन्न*
नूतन हेल्थ क्लबच्यावतीने प्रशालेत शुक्रवार ( ता. १२ ) रोजी बँडमिंटन एकेरी क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत चोवीस स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. रवी गिरी , अतुल पाटील , उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे हे अनुक्रमे प्रथम , द्वितीय , तृतीय , पारितोषिकाचे मानकरी ठरले. यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम स्वरुपात पारितोषिक वितरण होणार आहे. स्पर्धेसाठी कै.पंडीतराव सुरवसे सेवाभावी संस्थेचे सहकार्य लाभले. या स्पर्धेत पंच म्हणून क्रीडा शिक्षक सतिश नावाडे , सुरज शिंदे , शाम पांचाळ , सुनील राठोड, यश सांगताणी, स्पर्धा संयोजक प्रा.नागेश कान्हेकर, गणेश माळवे. यांनी काम पाहिले.


COMMENTS