भारत सरकारच्या केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अधिपत्याखालील दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा १० मार्च २०२१ रोजी कामगार शिक्षण मंडळाची प्रशासकीय समिती गठीत करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
संपूर्ण देशात या मंडळाची एकूण ५८ प्रादेशिक संचालनालये कार्यरत आहेत. ह्या सर्व प्रादेशिक संचालनालयांमधून कामगारांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असते. ह्या सर्व देशव्यापी कारभारावर जी समिती नियंत्रण ठेवते, त्याच केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय समितीवर हिंद मजदूर सभेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईस युनियनचे सरचिटणीस व मुंबई बंदराचे विश्वस्त सुधाकर अपराज ह्यांची पुढील ३वर्षांसाठी फेरनिवड करण्यात आली आहे.
त्यांनी ह्या अगोदरच्या प्रशासकीय समितीवर अतिशय अभ्यासपूर्ण काम करून स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा असा खास ठसा उमटविला होता. त्यामुळेच ते मंडळाच्या सर्वच अधिकारी व सदस्यांमध्ये तसेच कामगारांमध्ये लोकप्रिय आहेत. ह्याचीच परिणती म्हणून पुन्हा तीन वर्षांसाठी त्यांची प्रशासकीय समितीच्या सदस्यपदी सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली आहे. त्यामुळेच गोदी कामगारांसह समाजाच्या सर्वच थरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे
आपला
मारुती विश्वासराव
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

COMMENTS