नांदेड़ (अहमद लड्डा)
नेहरू युवा केंद्र संगठन युवा व क्रीडा मंत्रालय भारत सरकार भारतीय पुरातत्व विभाग आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय यांच्या वतीने दिनांक १२ मार्च २०२१ रोजी दांडी मार्चच्या व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोस्तवाचे औचित्य साधून नेहरू युवा केंद्र नांदेड च्या वतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे ८० युवकांचे जिल्हास्तरीय युवा संसदेचे आयोजन करण्यात आले. मा श्री एस .बी . गायकवाड वरिष्ठ भुवैद्यानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नांदेड यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. सर्व प्रथम महात्मा गांधी व सुभाष चंद्र बोस आणि सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आवडते भजन 'वैष्णव जन तो तेने कहिये' या भजनाने सुरुवात केली.
आझादी का अमृत महोत्सव India @75 हा १२ मार्च २०२१ पासून ते ७५ आठवडे जिल्यामध्ये राबविण्यात येणार आहे.यामध्ये देशभक्तीपर गीत, पदयात्रा, सायकल रॅली व राष्ट्रपुरुष्याच्या आठवणींना उजाळा देण्याचे कार्यक्रम घेण्यात येणार आहे .यामध्ये जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, शिक्षण विभाग व महानगरपालिका यांच्या सहयोगाने जिल्हा व ग्रामीण स्तरावर विविध कार्यक्रम घेण्यात येतील .यामध्ये युवा पार्लमेंट, राष्ट्रनिर्माण सामुदायिक विकास यामध्ये युवकाचे महत्वपूर्ण रोल असल्याचे चंदा रावलकर जिल्हा युवा अधिकारी यांनी प्रास्ताविकातून विषद केले. अँड विष्णू गोडबोले यांनी भारतीय स्वातंत्राचा इतिहास विषद केला.अध्यक्ष समारोपामध्ये युवकाने आपले आचार -विचार, कृतत्वे हे राष्ट्रपुरूषांनी दिलेल्या शिकवूनी नुसार आचरणात आणावे व आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी युवकांनी सज्ज राहावे. असे आवाहन श्री बिरादार प्राचार्ये औधोगिक प्रशिक्षण संस्था नांदेड यांनी केले. उपरोक्त कार्यक्रम कोव्हीड -१९ नियमाचे पालन करून आयोजित करण्यात आला. या कार्येक्रमाचे सूत्रसंचालन राफे एस एन यांनी केल.कार्यक्रम एन एस एस विभाग व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या सहयोगाने यशस्वी झाला.ह्या कार्यक्रमात सर्व सहभागींना नेहरू युवा केंद्रा तर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमासाठी संदीप आडे, शीतल क्षिरसागर, जान्हवी डांगे, लवकुश जाधव आणि सतीश चापालकर यांनी परिश्रम घेतले .

COMMENTS