धर्माबाद (अहमद लड्डा) जागतिक महिला दिनी धर्माबाद तालुक्यातील प्राथमिक शाळा येवती चे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री शिवकुमार पाटील यांनी "बेटी बचाव बेटी पढाव" या कार्यक्रमांतर्गत इयत्ता 5 वी ते 8 वीच्या मुलींसाठी
१)मी बदलत आहे, माझ्यात बदल होत आहे.
२)मुलींचे आरोग्य व स्वच्छता. या विषयावर समुपदेशनाचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात गावातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गावच्या नूतन महिला सरपंच सौ. सुनिता रामराव भोसले या होत्या. प्रमुख पाहुणे डॉ. शिवप्रेमा विभुते वैद्यकीय अधिकारी NRHM, परिचारिका सौ.रेणके मॅडम, सहशिक्षिका सौ.पुष्पा नोरलावार मॅडम ह्या होत्या.
डॉ. शिवप्रेमा विभुते यांनी मुलींचे आरोग्य व स्वच्छता या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून मुलींचे समाधान केले.
सौ रेणके मॅडम यांनी किशोरवयीन मुलींच्या समस्या या विषयी समुपदेशन केले .
सहशिक्षिका सौ.पुष्पा नोरलावार यांनी "मी बदलत आहे माझ्यात बदल होत आहे" या विषयावर सहशिक्षिका सखोल माहिती दिली.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्या सौ. शांताबाई सोनकांबळे,सौ.कविता
कुंठेवाड,शाळा व्यवस्थापन समितीच्या सौ.अर्चना पेंडकर श्रीमती प्रेमालाबाई सूर्यवंशी, परिचारिका सौ.सोमठाणे मॅडम, अंगणवाडी ताई श्रीमती ललिता पडोळे, सौ.अनिता सितावार, सेविका सौ.सावित्राबाई चंबोले, माता-पालक गंगाबाई
वाढवणकर, मंगलाबाई मरकंटे अनिता गंजेवार ,जयश्री वाघमारे करुणा सोनटक्के व इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री वेंकटेश बत्तुलवार ,श्री पंडित दगडगावे श्री गोविंद येळगे यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS