नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
जनतेची कामे प्राधान्याने सोडवत गावचा सार्वगिन विकास केल्याने गेली दोन दशकापासुन वजीरगांव ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व असुन पुन्हा एकदा डाॅ बि.एस.ढगे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला असुन विरोधकांना खाते ही खोलता आले नाही.जनतेचा सेवक म्हणून काम करीन अशी प्रतिक्रिया डाॅ. ढगे यांनी दिली आहे.
वजीरगांव ग्रामपंचायत गेली अनेक वर्षापासून डाॅ.बि.एस.ढगे यांच्या ताब्यात आहे. विकासाचा दृष्टिकोन असलेल्या डाॅ. ढगे यांना गावा मध्ये अनेक विकासाचे कामे करत सर्व सामान्य जनतेच्या सुख दुःखात सैदव सोबत राहत आसल्याने गावक-यांनी पुन्हा एकदा डाॅ .ढगे यांच्या पॅनलला प्रचंड मतानी नऊचे नऊ उमेदवार निवडून दिले आहे .वेगवेगळ्या विभाचा निधी भरीव निधी गावात आनुन गावचा कायापालट केल्याने गावक-यांचा विश्वास जिंकण्यात डाॅ.ढगे यांना यश आले आहे.
नायगांव तालुक्यातील शेवटच्या टोकाला आसलेले गाव म्हणजे वजीरगांव गावातून राज्य मार्ग गेला आसुन या भागातील दळवळणाची समशा सुटली आहे. राज्य मार्गची काम करत आसताना गावचे प्रमुख म्हणून डाॅ.ढगे. यांनी शेतक-याच्या आडचणी प्रामाणिकपणे सोडवल्या आहेत. आनेक शेतकरी रस्त्याचे काम होत आसताना आडचणी निर्माण झाल्या होत्या तेही मोठया धाडसाने समोर येऊन डाॅ.ढगे शेतकरी आणि शासन यांच्यातला दुवा म्हणून समजतो केला आहे.
विकासाची दुरदृष्टी आसलेल्या डाॅ.ढगे व विश्वबंर ढगे यांच्या पॅनलला मतदारांनी भरभरून साथ देत विरोधी पॅनलचा जोरदार पराभव करून विजयाची माळ डाॅ.ढगे यांच्या गळयात टाकली. विजय होताच डाॅ ढगे यानी सर्व विजय उमेदवार आणि जेष्ठ मार्गदर्शक यना सोबत घेऊन गावतील तमाम जनतेचे आभार मानले
आभार मानले आहे. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार येणा-या काळात वजीरगांव हे गाव डीजीटल गाव म्हणून नांदेड जिल्हयाच्या नकाशावर झळकताना दिसेल आशी प्रतिक्रीया बोलताना दिली आहे.
COMMENTS