नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
महाराष्ट्र शासनाने नुक्ताच दिनांक १४ जानेवारी २०२१ रोजी संगणक परिचालक यांच्यावर अन्याय करणारा जो शासन निर्णय काढला आणि आपले सरकार प्रकल्पात ३९२ कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या CSC-SPV कंपनीला पुन्हा काम दिले त्याच्या निषेधार्त नायगांव तालुका संगणकपरीचालक संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर दिनांक २५ जानेवारी रोजी काळ्या फीती लावून निषेध आंदोलन करत गटविकास अधिका-यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे
मागील अनेक वर्षापासून गावातील ग्रामपंचायत स्थरावर महत्वाची भुमिका बजावणा-या संगणकपरीचालकांचे प्रश्न हे सरकार आडगळीत टाकून भ्रष्टाचारी कंपनीला पाठीसी घालण्याचे काम केले आहे त्याच्या निषेधार्त आज जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला आहे .
आणि १४ जानेवारी २०२१ चा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करा ,
सर्व संगणक परिचालक यांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्या , आपले सरकार प्रकल्पात ३९२ कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या CSC-SPV कंपनीवर कारवाई करा आदी मागण्यांचे निवेदन दिले .
यावेळी तालुकाध्यक्ष शेषेराव बेलकर , दिपक बच्छाव , रामेश्वर पवार , पांडुरंग बनसोडे , गंगाधर गंगासागरे , संभाजी पांचाळ , रामकृष्ण मोरे , गजानन कदम , रामेश्वर वजीरगावे , बालाजी मेहत्रे , बाजीराव ढगे , गजानन हेंडगे , शैलेश जाधव , शेख मोलासाब , खुशाल शिंपाळे , तिरुपती जाधव , सपना हंबर्डे , सविता मोरे , गंगासागर सज्जन , मिनाताई संगेपवाड यांसह अनेक संगणकपरीचालक उपस्थीत होते .

COMMENTS