धर्माबाद (अहमद लड्डा) राष्ट्रीय मानव विकास संसाधन चे मराठवाड़ा अध्यक्ष व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हा पासपोर्ट अधिकारी श्री. डॉ. तौफ़ीक़ पठाण यांनी शारदा भवन संस्थेच्या यशवंत महाविद्यालयास भेद दिली। प्राचार्यपदासाठी ज्ञानी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. गणेशराव शिंदे यांची निवड झाली.त्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले व कौतुक ही केले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी डॉ. गणेशराव शिंदे यांची प्राचार्य पदी निवड केल्याबद्दल डॉ पठाण यांनी श्री चव्हाण यांचे सर्व नांदेड़ च्या जनते तर्फे आभार मानले. डॉ पठाण यांचे बालमित्र असलेले डॉ. शिंदे हे प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत डॉ. शिंदे आणि डॉ. पठाण हे दोघे ही बालमित्र राहिले आहे. डॉ. शिंदे हे एक जिज्ञासू, तत्वज्ञानी आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहेत. डॉ. शिंदे यांच्याकड़े नवीन, नवीन कल्पनाशक्ती असल्याने यशवंत महाविद्यालयाची आणखी प्रगती होईल, असे आमच्या प्रतिनिधिशी बोलताना डॉ.पठाण म्हणाले.
वरील दोघेही नांदेडमध्ये प्रथम श्रेणी अधिकारी पदावर सेवा देत आहेत. डॉ. गणेशराव शिंदे यशवंत महाविद्यालयात प्राचार्य, तर पासपोर्ट अधिकारी पदावर डॉ. तौफिक पठाण कार्यरत आहेत. या दोघांनी ही भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. ह्यानुसार यांची भेट झाली. आपल्या बालपणातील आठवणीनां यांनी पुन्हा जिवंत केले होते. हे दोघे ही एकमेकांना भेटून खूप आनंदित झाले आणि खूप भावुक देखील झाले.

COMMENTS