नायगांव प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार )
६३ ग्रामपंचायतींच्या ५०४ जागांसाठी २०१. मतदान केंद्रावर ९९ हजार १७६ पैकी ८०८६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने तालुक्यात ८१.५३ टक्के मतदान झाले आहे.१०८० सर्वच उमेदवारांचे भवितव्य ईव्हिएम मशीन मध्ये बंद झाले आहे.
कोरोना महामारी संकट असतांना पहिल्यादांच ग्रामपंचायतीच्या निवडणूकीस गाव पुढाऱ्यांसह उमेदवार आणि मतदार तिघेही सामोरे जात असतांना अनेक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन झाल्याचे दिसून आले नाही.खंडगाव, कांडाळा, मोकासदरा येथे शाब्दीक चकमक झाल्याचा प्रकार लक्षात येताच पोलिस त्याठिकाणी पोहचल्याने मतदान शांतातेत पार पडले.
नायगांव तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींसाठी दि.१५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरवात झाली सकाळी मतदानाची टक्केवारी वाढली नसली तरी दुपार नंतर मतदानाची टक्केवारी वाढली असून आता कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तालुक्यातील नरसी,टाकळी बु.,होटाळा, गडगा,गौरी शेळगाव, माजरंम, मुगाव, बरबडा, काहाळा, घुंगराळा सह आदी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये दिग्गजांचे भवितव्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
तर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा प्रचार मतदारांच्या गाठीभेठी घेऊन केला गेला असुन तरूण उमेदवार तर सोशल मीडियातून मतदान सुरु झाल्यानंतर ही प्रचार यंत्रणा राबवित होते. गुरूवारी मकर संक्रांतीनंतर मतदार कोणावर संक्रांत आणणार याचा फैसला दि. १८ जानेवारीला होणार आहे. , तहसिलदार गजानन शिंदे, यासह अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राची पाहणी करून कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या. मतदान शांततेत पार पडल्याने नायगांव, कुंटुर, रामतीर्थ पोलिसासह बाहेरुन आलेल्या पोलिस प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.

COMMENTS