लसीकरणासाठी नांदेड जिल्हावासीय स्वयंस्फुर्तपणे पुढे येतील - पालकमंत्री अशोक चव्हाण

पहिल्या लसीकरणाचा बहुमान सदाशिव सुवर्णकार   नांदेड (जिमाका) दि. 16 :- बहुप्रतिक्षेत असलेल्या कोरोना लसीचा शुभारंभ पालकमंत्री अशोक चव्हाण यां...


पहिल्या लसीकरणाचा बहुमान सदाशिव सुवर्णकार 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- बहुप्रतिक्षेत असलेल्या कोरोना लसीचा शुभारंभ पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली आज नांदेड जिल्ह्यात झाला असून ही पहिली लस घेण्याचा बहुमान आरोग्य समुपदेशक सदाशिव सुवर्णकार यांना मिळाला. ही लस घेण्यासाठी सर्व दडपनांना झुगारुन पुढे येत त्यांनी आरोग्य साक्षरतेच्या लसीकरण चळवळीचा नवा अध्याय निर्माण केला. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात आयोजित करण्यात आलेल्या शुभारंभ कार्यक्रमासाठी मुंबई येथून झुमद्वारे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मनमोकळा संवाद साधत नांदेड जिल्ह्याच्या आरोग्य विभागातील सहकारी कर्मचाऱ्यांचा गौरव केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिरसीकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

मागील दिडवर्षे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या संपूर्ण टिमने स्वत:ला झोकून देवून काम केले आहे. यात ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या आशा वर्करपासून कोविड बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपर्यंतच्या यंत्रणेचा समावेश आहे. ज्या धैर्याने जिल्ह्यातील लोकांनी शासनाने दिलेल्या सर्व उपाय योजनांचा अवलंब करुन कोरोनाशी दोन हात केले त्याच धैर्याने नांदेड जिल्हावासी लसीकरणासाठी पुढे येऊन जिल्हा आरोग्य यंत्रणेला साथ देईल असा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. त्यांनी वैद्यकीय विभागातील सर्व टिमला लसीकरणाच्या शुभारंभानिमित्त शुभेच्छा दिल्या. प्रारंभी आमदार अमर राजूरकर यांनी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या कोविड काळात केलेल्या सेवेबद्दल नांदेडकरांच्यावतीने कृतज्ञता म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांचा सत्कार केला.   

जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा शुभारंभ मुदखेड तालुक्यातील मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सुरु करण्यात आला. या ग्रामीण लसीकरणाच्या शुभारंभाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ग्रामीण भागातील पहिली लस घेण्याचा बहुमान आरोग्य सेवक मोहमंद खैसर मो. इस्माईल यांना मिळाला. मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांनी रांगा लावून ही लस घेत आरोग्य साक्षरतेच्या या चळवळीला नवा आयाम दिला. 

गेल्या दिड वर्षात कोविड सारख्या कठीन काळात आरोग्य विभागातील महिला हिरहिरीने न डगमगता न घाबरता पुढे झाल्या. शासनस्तरावरुन त्यांना ज्या सूचना भेटल्या त्याची प्रभावी अंमलबजावणी करुन दाखविली. एखाद्या सैन्याच्या तुकडीप्रमाणे आरोग्य विभागातील संपूर्ण टिमने काम करुन समाजाला जो विश्वास दिला त्याला तोड नाही. लसीकरणाची ही मोहिमसुद्धा आरोग्य विभागातील संपूर्ण कर्मचाऱ्यांसमवेत महिला टिम समर्थपणे पार पाडल्याशिवाय राहणार नाही या शब्दात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर यांनी गौरव केला. लसीकरणाचा आजचा दिवस दिवाळीच्या आनंद सणापेक्षा मोठा असून खऱ्या अर्थाने कोरोनाच्या या भितीतून आपण कात टाकली असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी सांगत आरोग्य विभागाला शुभेच्छा दिल्या. माणसासमवेत प्राण्यांवरही या आर्थिक वर्षात संकट आले. लंम्पीसारखा आजार असो अथवा बर्ड फ्ल्यू सारखा आजार, या कठीन काळात जनतेला सावरण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शासकिय यंत्रणा कुठे कमी पडली नाही, असे जिल्हा परिषदेच्या कृषि व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी प्रास्ताविक करुन जिल्ह्यातील आरोग्य विभागाने केलेल्या कार्याचा आढावा मांडला.   

लसीकरणाच्या पहिल्या फेरीत जिल्ह्यातील सुमारे 17 हजार 99 हेल्थ वर्करना ही लस दिली जाणार आहे. यात 631 वैद्यकीय अधिकारी, 1 हजार 489 परिचारिका, 1 हजार 530 अशा वर्कर्स, 5 हजार 632 अंगणवाडी सेविका, 1 हजार 845 बहुउद्देशीय कर्मचारी, 2 हजार 957 फ्रंटलाईन वर्कर, 1 हजार 323 पॅरामेडिकल, 1 हजार 302 सहाय्यक कर्मचारी, 390 कार्यालयीन संबंधित कर्मचा

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group