(बालाजी पाटील) : मुखेड तालुक्यातील उंद्री(प.दे) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी कडेकोट बंदोबस्तात निवडणूक प्रक्रिया पार पडली,असल...
(बालाजी पाटील) :
मुखेड तालुक्यातील उंद्री(प.दे) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी कडेकोट बंदोबस्तात निवडणूक प्रक्रिया पार पडली,असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.ग्रामपंचायतीसाठी ९ जागेसाठी २० अर्ज दाखल करण्यात आले होते.ग्रामपंचायतीत वार्ड ३ असुन मतदार संख्या १८२८ आहे.आज एकूण मतदान १५७६ आहे.यात पुरुष ८३३,स्त्री ७४३ मिळून ८६.२१% एवढे मतदान झाले.यात काही किरकोळ बाचाबाची वगळता मतदान केंद्रावर अतिशय उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात काळजीपूर्वक ही प्रक्रिया पार पडली.२० उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे.सरपंच पदाला अधिकार वाढल्यामुळे सरपंच पदाची निवडणूक चुरशीची दिसून आली.

COMMENTS