बनसारोळा :- येथील जनविकास महाविद्यालयाच्या वतीने नववर्ष व प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त बनसारोळा येथील शिवारात रोज...
बनसारोळा :- येथील जनविकास महाविद्यालयाच्या वतीने नववर्ष व प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त बनसारोळा येथील शिवारात रोजगाराच्या शोधात आलेल्या व पाल टाकून वास्तव्यास असणाऱ्या भटक्या-विमुक्त समूहातील लोकांना ब्लॅंकेटस मास्क व मिठाईचे वाटप करून प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी प्राचार्य डॉ.बाबासाहेब गोरे यांनी पालावरील लोकांना कोरोना साथीबद्दल मार्गदर्शन केले. या लोकांचे थंडी व कोरोना साथी पासून संरक्षण व्हावे यासाठी प्रत्येक कुटुंबास दोन ब्लॅंकेटस पाच मास्क व मिठाईचे वाटप करण्यात आले.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते
COMMENTS