जाहूर ता.मुखेड (बालाजी पाटील) :-
मुखेड तालुक्यातील उंद्री(प.दे) मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचाराचा नारळ बहुजन ग्रामविकास आघाडी पँनल ने आज फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली.उंद्री(प.दे)ग्रामपंचायत मध्ये एकूण तीन वार्ड आहेत व नऊ उमेदवार आहे सर्व उमेदवारांना विजयी करा असे आव्हान करण्यात आले.ही निवडणूक काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा उंद्री नगरीचे भाग्यविधाते माधवराव पाटील वडजे उंद्रीकर यांच्या मार्गदर्शना खाली व यशवंतराव बोडके यांच्या सहकार्याखाली तसेच सुधाकर गुरूजी गन्लेवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे.यावेळी सांगण्यात आहे की ही ग्रामपंचायत सर्वसामान्यना आपली वाटली पाहिजे असे सांगण्यात आले.उंद्री (प.दे) ग्रामपंचायत निवडणूक 2020-21 निमीत्ताने बहुजन ग्रामविकास आघाडी पँनलच्या वतीने आज गावातील सर्व आद्य दैवतांच्या चरणी नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रथमतः स्व.लक्ष्मीबाई उर्फ साखरबाई माधवराव पा.वडजे यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तसेच या दु:खद घटनेमुळे पँनल प्रमुख माधवराव पाटील उंद्रीकर यांच्यावर बंधने आली असल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःला उमेदवार समजून मेहनत घेऊन गावातील बहुजन ग्रामविकास आघाडीच्या तीन प्रभागातील 9 उमेदवारांना निवडून आणण्यासाठी यावेळी वचनबद्ध असल्याचे जाहीर केले.या प्रचाराच्या शुभारंभी गावातील युवा ,ज्येष्ठ ,सर्वसामान्य ,गोरगरिब तरूण,महिला,शेकडो नागरिक उपस्थित होते.


COMMENTS