नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
शहरातील पानसरे नगर येथील सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेल्या श्री शिर्डी साईबाबा प्रति स्वरूप समजले जाणाऱ्या श्री साईबाबा मंदिरातील साईबाबांच्या मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा चा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या श्री साईबाबांच्या मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा वर्धापन दिनानिमित्ताने दिनांक आठ जानेवारी 2021 शुक्रवार रोजी ते 10 जानेवारी 2021रविवार मुख्य दिवसापर्यंत सतत तीन दिवस चालू राहणार असून दररोज पहाटे सव्वा पाच वाजता काकड आरती सहा वाजता मंगलस्नान आठ वाजता श्री नैवेद्य आरती दुपारी बारा वाजता मध्यान आरती व तीर्थप्रसाद सायंकाळी साडेसहा वाजता धुपारती रात्री सव्वा आठ वाजता शेजारती तसेच मुख्य दिवस दिनांक 10 जानेवारी रोजी पहाटे काकड आरती सकाळी सहा वाजता असतो तर कलश पूजा सकाळी नऊ वाजता नैवेद्य आरती दहा वाजता हरिदासी कीर्तन प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प श्री विक्रम महाराज नांदेडकर यांचे कीर्तन दुपारी साडेबारा वाजता मध्यान आरती व तीर्थप्रसाद दुपारी एक वाजता महाप्रसाद सायंकाळी साडेचार वाजता पुष्परचना सहा वाजता धुपारती रात्री सव्वा आठ वाजता शेजारती असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती श्री साईबाबा मंदिर पानसरे नगर येथील मंदिराच्या विश्वस्त प्रशासनाच्या वतीने प्रसिद्ध माध्यमाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

COMMENTS