जुन्नी गांव बिनविरोध काढण्याच्या दिशेने वाटचाल सुरु


धर्माबाद (अहमद लड्डा)

 यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेमध्ये मौजे जुन्नी या गावामध्ये

आमदार राजेश पवार यांनी केलेल्या बिनविरोध गावांना दत्तक घेण्याचे आव्हानाला प्रतिसाद देत तालुक्यात जुन्नी हे गाव बिनविरोध काढण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.परंतु गाव म्हणल्यानंतर बऱ्याच बाबी राजकीय दृष्ट्या अवघड असतात, गावात सर्व वार्डात फॉर्म भरण्यात आले परंतू, गाव बिनविरोध काढावे व आमदारांकडून असेल किंवा इतर राजकीय मंडळींकडून गाव हिताची कामे करून घ्यावी. अशी गावातील प्रमुख मंडळींची इच्छा होती, यामध्ये जक्कोजी पाटील,मा.सभापती दत्तात्रय रेड्डी, अंबादास पा.डांगे, विजय पा.डांगे,दिगंबरराव पाटील,लालू रेड्डी, 

 गंगाधरराव कोठवाड,सुभाष कराळे,गणपतराव दोनगिरे,दिगंबर पुन्नावाड,नारायण पुन्नावाड, राजु पाटील, बाबू पाटील, माधवराव हांद्रे, गुरूचरण रेड्डी ,मारुती जिरगे,मारुती अडबले, गोविंदराव चिवटे, शिवाजी कौठवाड,किष्टना झंपलवाड, मोहन टोकलवाड, भोजराम इबितवार,रवी पांचाळ,द्वारका पांचाळ,शेख सलीम बासूयामिया, साईनाथ लोसरवार, यल्लप्पा कोंडलवाडे, साईनाथ मनूरे, राहुल तुरेराव परसराम बोईवार हे प्रत्येक समाजातील प्रमुख मंडळींचा सहभाग होता. म्हणूनच संपूर्ण गावातील प्रमुख बसून जेवढे भरलेले फॉर्म होते, गावहिता साठी माघार घेण्यास तयारी दाखवली, अशा पद्धतीने मौजे जुन्नी या गावात नऊ पैकी आठ उमेदवार बिनविरोध,ते

अर्चना जितेंद्र रेड्डी जुन्नीकर,अंबादास पा डांगे, सोनालीताई चंद्रकांत पाटील, संगीताताई दत्तात्रेय गुंडुरे, अनुसयाबाई बाबुराव विभुते, तानाजी दिगंबर कोंडलवाडे, सुनिताताई सदानंद गांदलेवाड आणि श्रावण नामदेव तुरेराव निघत गाव आदर्शच्या मार्गस्थ निघाले, या निवडीवरून आमदार राजेश पवार, आमदार राम पाटील रातोळीकर व खासदार चिखलीकर यांनी ही शुभेच्छा दिल्या व आम्ही आपल्या गावासाठी विकासाच्या दृष्टीने सदैव तत्पर राहणार असल्याचे सांगितले व शुभेच्छा ही दिल्या व विशेषता आमदार राजेश पवार यांनी गाव दत्तक घेणार असल्याचे आश्वासनही दिले.

टिप्पण्या