नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार)
येथील शरदचंद्र महाविद्यालयातील वुमन सेलच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान या विषयावर ई- चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी नायगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव रविंद्र वसंतराव चव्हाण हे होते तर या चर्चासत्राचे उद्घाटन शरदचंद्र महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका डॉ. कल्पना डोंबे यांच्या हस्ते झाले यावेळी त्या म्हणाल्या की, फुले दाम्पत्यांनी ध्येयानी प्रेरित होऊन कार्य केल्या.ब्रिटीशांनी त्यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांचा सत्कार केला पण भारतीयांना त्यांच्या कार्याची दखल घेणे जमले नाही. कार्यक्रमाचे प्रमूख व्याख्याते म्हणून स्वा रा तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील वृतपत्र विद्या व जनसंवाद शाखेचे प्रा.डॉ. राजेंद्र गोणारकर व बहिर्जी स्मारक महाविद्यालय वसमत येथील प्रा डॉ. शारदा कदम या होत्या. यावेळी डॉ. गोणारकर म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांचे कार्य संबंध जगातील महिलांना प्रेरणा ठरेल असे आहे. सत्यशोधक विवाहाच्या माध्यमातून समतेचे तत्व अंगिकारले, भारतातील सामाजिक,धार्मिक व शैक्षणिक व्यवस्था अतिशय विरोधी असतांना, मुलींना शिक्षण म्हणजे धर्म बुडवल्याचा सनातनी विचार असताना फुले दाम्पत्यांनी 1 जाने,1848 रोजी पहिली मुलीची शाळा काढून सातत्याने नवनवीन शाळा उघडण्याचा त्यांनी प्रयत्न केला.डॉ शारदा कदम यांनी म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांच्या काळात स्वर्ग नरकच्या संकल्पना दृढ असतांना समाजपरिवर्तनाचे कार्य हाती घेतले. सध्याच्या काळातही परिवर्तनाच्या कार्यक्रमासाठी बायका, मुली उपस्थित राहात नाहीत तर सत्संगाच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी करतात म्हणून त्यांच्या विचाराचा खराखुरा वारसा सर्व भारतीय महिला पुरुषांने घ्यायला हवे. कार्यक्रमाचे सुंदर प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य तथा चर्चासत्राचे मार्गदर्शक डॉ.बी.डी. इंगळे सरांनी केले. प्रा.डॉ. वैभव कवडे ग्रंथपाल डॉ बी.आर. लोकलवार, प्रा.डॉ. संजीवकुमार भालेराव यांनी तांत्रिक सहकार्य करून चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. संयोजन समितीतील प्रा.डॉ.एस ए शिंदे मॅडम, प्रा.डॉ. संजीवनी वाडेकर मॅडम, प्रा.एम.एच. पांगरकर मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ठ पद्धतीने सुत्रसंचलन केले आणि मान्यवरांचा परिचयही करून दिला. प्रा डॉ. संजीवनी वाडेकर मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले. या चर्चासत्रामध्ये महाराष्ट्र व इतर राज्यातील प्राध्यापक प्राध्यापिका आणि शरदचंद्र महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता.
COMMENTS