दर्पण दिनानिमित्त धारूर येथे भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान व पुरस्कार वितरण

प्रतिनिधी I धारूर  आदर्श पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दर्पण दिनानिमित्त धारूर येथे महाराष्ट्रातील आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटी...


प्रतिनिधी I धारूर 

आदर्श पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दर्पण दिनानिमित्त धारूर येथे महाराष्ट्रातील आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे सोमवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे . या कार्यक्रमामध्ये पत्रकार तसेच तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायतला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

 आदर्श पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त धारूर येथील गरड मंगल कार्यालय या ठिकाणी सोमवार रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्रातील आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकार तसेच तालुक्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतला आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माजलगाव मतदार संघाचे आ. प्रकाश दादा सोळंके,प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष डॉ. स्‍वरूपसिंह हाजारी,भाजपा नेते रमेश आडसकर,माजी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे,जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती जयसिह सोळंके यांच्या उपस्थितीत होणार आहे .तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कुलकर्णी, धारूरच्या तहसीलदार वंदना शिडोळकर,उपविभागीय पोलिस अधिकारी भास्करराव जाधव,गट विकास अधिकारी आर.एस. कांबळे,पोलीस निरीक्षक सुरेखा धस, माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव बडे,प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल प्रा. ईश्वर मुंडे,नगर परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, संतोष शिरसट,नगर परिषदेचे गटनेते सुधीर शिनगारे,पंचायत समिती सभापती हनुमंत नागरगोजे, राजमुद्रा सामाजिक संघटनेचे सुरेश शेळके यांची उपस्थिती राहणार आहे. या वेळी किल्ले धारुर भूषण पुरस्कार सर्वोत्तम आण्णा गावर स्कर,उकृष्ठ प्रशासकीय अधिकारी डाॕ.चेतन आदमाने,आदर्श सामाजीक कार्यकर्ता इं . सादेक ईनामदार,आदर्श पञकार आभिजीत नखाते,शुभम खाडे,संदीपान तोंडे,संतोष स्वामी तर आदर्श ग्रामपंचायत व्हरकटवाडी,सोनिमोहा,आम्ला,मोरफळी,कोळपिंपरीला सन्मानित करण्यात येणार आसल्याची माहिती किल्ले धारूर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल कावळे, कार्याध्यक्ष सचीन थोरात, सचिव बालाप्रसाद जाजु, उपाध्यक्ष नाथा ढगे यांनी दिली आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel